Friday, 16 June 2017

राजमाता जिजाऊ..

#राजमाता #जिजाऊ माँ #साहेबांच्या
#स्मृतीदिनानिम्मित्त #विनम्र #अभिवादन....

Thursday, 15 June 2017

महा कवि...नामदेव ढसाळ....

*महाकवी नामदेव ढसाळ यांची         समाजस्थिती विषद करणारी एक कविता...*

     ' *तहाची कविता*..'

व्हा, रे ..आता शहाणे
शोधू नका ' बहाणे..
आपलीच ' लोक 'हरली
आपल्यातल्या ' तहा ' ने...!

आपल्याच ' बहाद्दराने
केलिया 'आपली ' दैना
आपल्या 'लोकांविरोधी
आपलीच ' भिम सैना....!

आपल्यातूनी' पळाला
शत्रूस ..तो ' मिळाला..
देई ऊलट ..आरोळी
' तुम्हा ' भीमच' ना कळाला...!"

आपल्याच ' माणसाचं
चाले ' निराळं ' डोकं
आपल्याला' पाडणारी
आपली 'खट्याळ 'लोकं..!"

अकलेचा 'आलेख 'आमच्या
कधीही सरळ' ना "गेला
बापाच्या.. 'विरोधात
मुलगाच 'ऊभा' केला...!"

परक्या 'घरात 'सत्ता
आम्हीच 'देत' गेलो
आपल्याच समाजाची
' मज्जाच ' घेत गेलो...!"

सतराशे' साठ 'आम्ही
अमुक  'टमुक' गटाचे '
'कसू -कसून ' आटे
गेलेत.. रे..नटाचे....!"

दोरी'  जरी' जळाली
तरी ' पिळ ' जात नाही
टिकाविना ..रिकामा
इथे ' ईळ 'जात नाही..!"

सोडून द्या ते 'पक्ष'
सोडा मनाचा' हट्ट'
बांधा एकीची 'मुठ'
आवळूनी घ्या रे ' घट्ट..

कळते बघा आम्हाला,
वळत ..कसे रे नाही...?
त्यांना दिव्याची "गाडी
तुम्हीच का ' पायी पायी...?"

आपलेच लोक झाले
आपलेच हाड ' वैरी..
झाडून आपल्यावरती
आपल्याच 'पाच" फैरी...!"

आपलेच ' गार ' केले
आपल्याच माणसाने
गाऊन पुन्हा आपल्याच
पराभवाचे'' गाणे...!"

महाकवी   -पँथर नामदेव ढसाळ
*भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बीड जिल्हा....

Wednesday, 14 June 2017

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर कविता"

*🙏🙏बाबा 🙏🙏*

*असामान्य तुझी किर्ती*
*शब्दात सांगणे शक्य नाही*
*अमर्याद तुझी उंची*
*विश्वाला कळणे शक्य नाही...*


*हजाराे वर्ष कुणालाही*
*जे शक्य झाले नाही*
*त्याकरिता तुझे अभिनंदन*
*करणे मला शक्य नाही ...*


*ॠण तुझ्या उपकारांचे*
*जीवनात फेडणे शक्य नाही,*
*उपकार तुझे ते भव्यदिव्य*
*मला विसरणे शक्य नाही...*

*आकाशाहुनी तुझे भव्य स्मरण*
*ह्रदयातुन जाणे शक्य नाही,*
*करुणामय तुझ्या त्या आठवणी*
*अश्रुंनी पुसणे शक्य नाही...*

*मुंबईची ती दादर चैत्यभुमी*
*पावन झाली तुझ्या राखेने,*
*विश्वात असा महामानव पुन्हा*
*दुजा हाेणे कदापी शक्य नाही...*